मीरगाव येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:20 AM2020-12-05T04:20:39+5:302020-12-05T04:20:39+5:30

सिन्नरला एकाच दिवसात २६ रुग्ण वाढले सिन्नर : शहर व तालुक्यात एकाच दिवसात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ...

Burglary at Mirgaon | मीरगाव येथे घरफोडी

मीरगाव येथे घरफोडी

googlenewsNext

सिन्नरला एकाच दिवसात २६ रुग्ण वाढले

सिन्नर : शहर व तालुक्यात एकाच दिवसात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात आठ दिवसांत ८२ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांची एकूण संख्या ३५६४ झाली आहे. ३२६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर आत्तापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

१७ हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट

सिन्नर : तालुक्यात १७ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे, तर यात वाढ होेऊन २३ हजार २९८ हेक्टरवर पेरण्या होतील, असा अंदाज आहे. यावर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे रब्बी हंगामासाठी पोषक हवामान आहे.

कांद्याच्या दरात घसरण

सिन्नर : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची कांद्याच्या दरात घसरण झाल्याने चिंता वाढली आहे. थंडीचा कडाका वाढला असताना कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना हुुडहुडी भरली आहे. उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलला सरासरी एक हजार व नवीन लाल कांद्याच्या दरात ७०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे.

बीएसएनएलच्या नेटवर्क समस्येमुळे अडचण

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात बीएसएनएलचे नेटवर्क बंद पडत असल्याने अनेक शासकीय कार्यालये व ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क बंद पडत असल्याने पोस्ट ऑफिस व अन्य शासकीय कार्यालये व ग्राहकांचे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नेटवर्कची समस्या दूर करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Burglary at Mirgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.