घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 02:29 PM2020-07-11T14:29:27+5:302020-07-11T14:29:39+5:30
इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांच्या प्रकारात वाढ झाली आहे. दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे २ लाख ८० हजारांचा ऐवज लूटच्याचे समोर आले आहे. शहर व परिसरात लॉकडाऊन शिथिल होताच घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एम.आर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चोरट्यांनी ८ ते ९ जुलैच्या दरम्यान, कारखान्याचे शटर वाकवून कॉपर वायर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, महत्वाची कागदपत्रे चोरली. याप्रकरणी महेंद्र अशोक शिंपी (४३) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
पाथर्डीत घरफोडीत ९० हजारांचा ऐवज लुटला
पाथर्डी गावातील गवळीगल्ली परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे ९० हजार रु पयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
राजेंद्र सुरेश बाविस्कर (५१, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने ९ ते १० जुलै दरम्यान घरफोडी करु न ३० हजाराची रोकड, दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण सुमारे ९० हजार रु पये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला आहे.
-