शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:28 PM2019-09-14T22:28:15+5:302019-09-15T00:25:52+5:30

धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच ३५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

 Burglary sessions in the city begin | शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

Next
ठळक मुद्देगुन्हेगार मोकाट ; साडेचार लाखांचा ऐवज लुटला

नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र शहरात घरफोड्या, दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच ३५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
शहर व परिसरात ऐन गणेशोत्सवात गुन्हेगारीने डोके वर काढले. सोनसाखळी चोरीच्या घटनांपासून घरफोड्यांपर्यंत गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गणेशोत्सवात चोख पोलीस बंदोबस्तामुळे हजारो पोलीस रस्त्यावर होते. तसेच वाहने साततत्याने गस्तीवर असतानाही चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे धाडस केले. डीजीपीनगर क्रमांक-१मधील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आश्विनी भोसले (३३) यांची सदनिका अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरदुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केली. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. या प्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसºया घटनेत प्रबुद्धनगर येथील एका पीठ गिरणीच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३५ हजार ५०० रुपयांची रोकड, ९ हजार रुपये किमतीच्या तीन चांदीच्या मूर्ती असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रशांत उद्धव भोसले यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरात पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून, ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असतानाही चोरटे सर्रासपणे भरदिवसा बंद घरांचे कुलूप तोडून हजारो ते लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव काळात असे घडले गुन्हे
सातपूर, पंचवटी, आडगाव येथे खुनाचा प्रयत्न
इंदिरानगरला दोन तर म्हसरूळ, सातपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन सोनसाखळ्या चोरी
पंचवटी, सातपूर, मुंबई नाका हद्दीत जबरी चोरी
अंबड, इंदिरानगर, उपनगर, पंचवटी, सातपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना

Web Title:  Burglary sessions in the city begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.