घरफोडीतील संशयितांना अटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:02 AM2018-07-08T01:02:23+5:302018-07-08T01:02:39+5:30
मालेगाव : शहरातील अक्सा कॉलनी भागात घरफोडी करून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना रमजानपुरा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ मोबाइल व ५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

अक्सा कॉलनीत गेल्या गुरुवारी ५ रोजी सनाउल्ला मगबुल खान यांचे घरफोडून रोकड, मोबाइल, सोने असा १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व पथकाने तपासाची चक्रे गतिमान करीत या घरफोडीतील संशयित आरोपी शाहीद अहमद रियाज अहमद, एजाज अहमद ऊर्फ एजाज वायरमन रियाज अहमद, फय्याज अहमद रियाज अहमद, रईस अहमद ऊर्फ नाट्या अब्दुल हमीद या चौघा जणांना शिताफीने अटक केली आहे. त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १८ भ्रमणध्वनी व ५ हजारांची रोकड जप्त केली आहे. शहरातील विविध भागात झालेल्या चोºयांचाही उलगडा होणार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे हे करीत आहेत.