‘जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:47 AM2018-08-22T00:47:11+5:302018-08-22T00:48:11+5:30
‘स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से, लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से’, ‘अश्रु स्नेह हैं, बाती बैरिन श्वास हैं, जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’, ‘जब चले जाएंगे लौट के सावन की तरह, याद आएंगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह’ आदी कवितांच्या सादरीकरणासोबत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. सूर्यकांत चतुर्वेदी यांनी साठच्या दशकातील युवा पिढीत लोकप्रिय कवी ‘नीरज’ यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नाशिक : ‘स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से, लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से’, ‘अश्रु स्नेह हैं, बाती बैरिन श्वास हैं, जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’, ‘जब चले जाएंगे लौट के सावन की तरह, याद आएंगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह’ आदी कवितांच्या सादरीकरणासोबत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. सूर्यकांत चतुर्वेदी यांनी साठच्या दशकातील युवा पिढीत लोकप्रिय कवी ‘नीरज’ यांच्या आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रज स्मारकात मंगळवारी (दि.२१) कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ख्यातनाम कवी तथा हिंदी चित्रपट गीतकार नीरज यांच्या स्मृतींवर आधारित ‘नीरज की यादमें’ कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते. प्रा. सूर्यकांत चतुर्वेदी यांनी कवी नीरज यांच्या मैत्रीच्या विविध किश्श्यांसोबतच त्यांचा काव्यप्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले, नीरज यांच्या व्यक्तिगत आयुष्याला जोडून त्यांच्या काव्याची समीक्षा करण्यात आल्याने त्यांच्या काव्यावर अन्याय झाला. नीरज यांना अतिशय हलाखीत जीवन जगावे लागले होते. या संघर्षाचा प्रभाव त्यांच्या कवितांतून जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. काव्यसंमेलनांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.