पेटलेले सिलिंडर फेकले मैदानात..

By admin | Published: January 12, 2015 12:38 AM2015-01-12T00:38:30+5:302015-01-12T00:38:49+5:30

टळला अनर्थ : जिगरबाज युवकांचे धाडस; राखले प्रसंगावधान

Burned cylinders are in the ground. | पेटलेले सिलिंडर फेकले मैदानात..

पेटलेले सिलिंडर फेकले मैदानात..

Next

जुने नाशिक : वेळ साडेसहा वाजेची. ठिकाण नानावली. येथील टेकडीवरील लहान घरात अचानकपणे स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडर पेट घेतो. घरातील सर्व जण बाहेर पळतात. याच वेळी परिसरातील काही युवक धाडस करून घरात प्रवेश करतात आणि पेटलेले सिलिंडर सुरक्षितपणे मैदानात फेकण्यास यशस्वी होतात. पेटलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला असता तर भीषण आगीची घटना घडली असती; मात्र युवकांचे धाडसी प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होत होती.
जुन्या नाशकातील अमरधाम रोडवर असलेल्या नानावलीच्या टेकडीवर असलेल्या लहान घरांपैकी सलीम राजमंहमद शेख यांच्या मालकीच्या घरात राहत असलेले भाडेकरू मुन्ना यांचा इण्डेन कंपनीच्या गॅस सिलिंडरने अचानकपणे पेट घेतल्याची घटना संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. घरातील सदस्यांनी तातडीने बाहेर पलायन केले व परिसरात सिलिंडर पेटल्याची ओरड केली. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या युवकांची या ठिकाणी गर्दी जमली. धाडसी तरुणांनी पेटलेले सिलिंडर घरात घुसून बाहेर आणले व टेकडीखालील मोक ळ्या जागेत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांवर फेकले. दरम्यान, सुदैवाने यावेळी सिलिंडरचा स्फोट झाला नसल्याने सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नानावलीच्या सदर टेकडीवर दाट लोकवस्ती असून, सर्व घरे एकमेकांना लागून आहेत.
सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ होऊन जीवितहानी झाली असती,पण सुदैवाने हा धोका टळला असता. सदर घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला कळविण्यात आल्याने अवघ्या दहा मिनिटांतच शिंगाडा तलाव मुख्यालयातील बंब घटनास्थळी पोहोचला. जवानांनी तत्काळ गॅस सिलिंडरवर पाण्याचा मारा सुरू केला अन् सिलिंडर फुटण्यापूर्वीच विझविले.
अग्निशामक दलाच्या बंबाचे वाहनचालक देवीदास इंगळे, फायरमन संतोष आगलावे विजय नागपुरे, संजय कानडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. नानावली रस्त्याने आलेला बंब (एमएच १५ एबी ४०५१) हा गुमसुमबाबा चौकात रस्त्याचे काम सुरू असल्याने अडकला होता. (वार्ताहर)

Web Title: Burned cylinders are in the ground.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.