पेट्रोल टाकून मित्राच्या पत्नीला जाळले : महिला ९० टक्के भाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:04 PM2019-03-31T17:04:11+5:302019-03-31T17:08:16+5:30
या घटनेत रेखा बाळू मोरे ही (३२) सुमारे ९० टक्के भाजली तर तिला जाळणारा तिचा मानलेला भाऊ व पतीचा मित्र संशियत आरोपी रविंद्र नाना भामरे देखील दहा टक्के भाजला आहे. भामरे याने रेखाला जाळल्यानंतर औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पंचवटी : गेल्या अनेक वर्षांपासून मित्राकडे राहणार्या मित्राने मित्राच्याच पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळल्याची घटना रविवारी (दि.३१) सकाळच्या सुमाराला पंचवटीतील कृष्णनगर परीसरात असलेल्या हरी सिद्धी अपार्टमेंट येथे घडली आहे.
या घटनेत रेखा बाळू मोरे ही (३२) सुमारे ९० टक्के भाजली तर तिला जाळणारा तिचा मानलेला भाऊ व पतीचा मित्र संशियत आरोपी रविंद्र नाना भामरे देखील दहा टक्के भाजला आहे. भामरे याने रेखाला जाळल्यानंतर औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेत भाजलेल्या रेखाला खाजगी तर भामरेला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून सकाळी भरवस्तीत घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णनगर येथिल हरी सिद्धी अपार्टमेंट येथे फ्लॅट क्रमांक ७ मध्ये बाळू मोरे पत्नी रेखा मुलगी सायली तसेच बायकोचा मानलेला भाऊ व मित्र रविंद्र भामरे समवेत गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. मोरे हा खाजगी नोकरी करतो तर पत्नी घरकाम करते आण िमुलगी सायली सारडा शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गणेशवाडी शेरी मळ्यात राहणारा भामरे मिसळपाव गाडी लावतो. शनिवारी रात्री रेखा व तिचा मानलेला भाऊ भामरे यांच्यात एकत्र राहण्यावरून वाद झाले त्यानंतर रविवारी सकाळी रेखाचा पती बाळू हा कामासाठी बाहेर गेला त्यानंतर पुन्हा रेखा व रविंद्र यांच्यात शाब्दिक वाद झाले त्यावेळी घरात असलेली मुलगी सायली बाथरूम मध्ये होती त्यानंतर भामरे याने बेडरूम असलेल्या रेखा हिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले व तो टेरेसमध्ये येऊन थांबला त्यावेळी आवाज झाल्याने मुलगी घाबरून घराबाहेर पळाली काही वेळाने घरातून धूर निघत असल्याने नागरिकांनी अिग्नशमन दलाला माहिती कळविली त्यानंतर अिग्नशमन दलाच्या जवानांनी व नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला व घरात लागलेली आग विझविली त्यावेळी रेखा गंभीर भाजली होती तर भामरे याने देखील काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी पंचवटी पोलीस
पोहचले त्यांनी नागरिकांच्या मदतीने रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास पाटील, रघुनाथ शेगर, कैलास पाटील, सारिका अिहरराव, पोलिस उपनिरीक्षक आश्विनी मोरे, योगेश उबाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.