सिन्नर-शिर्डी महामार्गावर द बर्निंग कार चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 PM2021-07-14T16:30:36+5:302021-07-14T16:31:19+5:30

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरीजवळ पहाटे सहा वाजेच्या सुमारास कारने पेट घेतला. या आगेत कार जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

The burning car on the Sinnar-Shirdi highway | सिन्नर-शिर्डी महामार्गावर द बर्निंग कार चा थरार

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरीजवळ जळालेली कार.

googlenewsNext
ठळक मुद्दे वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीतची नोंद करण्यात आली आहे.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरीजवळ पहाटे सहा वाजेच्या सुमारास कारने पेट घेतला. या आगेत कार जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

नाशिकरोड येथील प्रतीक पंढरीनाथ पवार व वैभव राजू पवार हे आपल्या मर्सिडीज कारमधून (एम. एच. ०१ ए एक्स ६५०७) नाशिकरोड येथून शिर्डीकडे जात होते. पहाटे शिर्डीकडे जात असतांना कार पांगरी-वावी च्या दरम्यान पद्मावती नाल्याजवळ आल्यानंतर कारधून धूर निघू लागला. कारमधून धूर निघाल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभी करुन सर्वजण बाहेर पळाले.

क्षणार्धात कारने पेट घेतला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास जवळपास कोणी नसल्याने आग विझविण्यासाठी तातडीची मदत मिळाली नाही. घटनेची माहिती वावी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आग जळून मोठे नुकसान झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी मॉटोकॉर्लो कंपनीचा टॅँकर आग विझविण्यासाठी पाचारण केला.

मात्र तोपर्यंत कार जळून गेली होती. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीतची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सतिष बैरागी अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: The burning car on the Sinnar-Shirdi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.