इंदिरानगरमध्ये बर्निंग नॅनोने काळजाचा थरकाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:45 AM2018-12-23T00:45:07+5:302018-12-23T00:45:38+5:30
राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील नागरिकांनी नॅनोला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला़
इंदिरानगर : राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील नागरिकांनी नॅनोला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजेच्या सुमारास श्रीजयनगरमधील वृंदावन सोसायटीतील नरेंद्र सौंदाणकर (४६ ) हे नेहमीप्रमाणे नॅनो कारमधून (एमएच १४ डीए ५७७०) राणेनगरकडून समांतर रस्त्याने पाथर्डी फाट्याकडे जात होते़ त्यांच्या कारला पाठीमागून आग लागलेली होती, मात्र त्यांच्या लक्षात न आल्याने ते जात होते़ हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्यांना थांबवीत कारला आग लागल्याचे सांगितले़ यानंतर सौंदाणकर तातडीने कारच्या खाली उतरले अग्निशमन विभागास घटनेची माहिती दिली़
या दरम्यान नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ यानतर सिडकोच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला व त्यांनी आग आटोक्यात आणली़ मात्र, उशीर झाल्याने या नॅनो कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता़ शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़