मालेगावी राणेंच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:33+5:302021-08-25T04:18:33+5:30
मालेगाव : केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद ...
मालेगाव : केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद मालेगावीही उमटले. राणे यांच्या पुतळ्याचे मोसम पुलावर दहन करून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. राणे यांनी जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चा काढला होता. राणे यांच्या पुतळ्याचे मोसम पुलावर दहन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायालयाचे कामकाज सुरू असल्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन निकम यांना देण्यात आले. छावणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आंदोलनात सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख रामा मिस्त्री, विद्यार्थी सेनेचे विनोद वाघ, अजिंक्य भुसे, महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, मनोहर बच्छाव, विजय चौधरी, सखाराम घोडके, प्रमोद पाटील, यशपल बागूल, दत्ता चौधरी, राजेश अलिझाड, भीमा भडांगे, अनिल पवार, अमोल चौधरी, तानाजी देशमुख, दादा बहिरम, किशोर शिंदे, भारत बेद, सुनील चौधरी, अंजली कायस्ते, अरुणाताई चौधरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----------------
मालेगावी मोसम पुलावर केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करताना सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, रामा मिस्त्री, मनोहर बच्छाव, विनोद वाघ, अजिंक्य भुसे, प्रमोद पाटील, यशपाल बागूल, दत्ता चौधरी, राजेश अलिझाड, भीमा भडांगे, सुनील चांगरे, अनिल पवार, विजय चौधरी आदी.
(२४ मालेगाव राणे)
240821\24nsk_15_24082021_13.jpg
२४ मालेगाव राणे