पाच एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 02:02 AM2019-01-07T02:02:04+5:302019-01-07T02:02:29+5:30
सायखेडा : येथून जवळच असलेल्या शिंगवे येथे उसाच्या शेताजवळून जाणाऱ्या माल वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने रस्त्याच्या कडेला असणाºया विद्युत तारांना ओढल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
सायखेडा : येथून जवळच असलेल्या शिंगवे येथे उसाच्या शेताजवळून जाणाऱ्या माल वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने रस्त्याच्या कडेला असणाºया विद्युत तारांना ओढल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीने मोठे नुकसान झाल्याच्या परिसरातील सर्वांत मोठी घटना आहे. शिंगवे येथील शंकर मोगल, नरहरी मोगल (गट नंबर ३९२) यांचे मालकीचे दीड एकर, जिजाबाई मोगल, विठ्ठल मोगल (गट नंबर ३९०,३९१) यांचे सव्वा एकर, तुकाराम रायते (गट नंबर ३८९) यांचे अर्धा एकर, हिरामण गिते (गट नंबर ५१४) यांचे दीड एकर, तर रामा रायते (गट नंबर ५१४, ५१५) यांच्या मालकीचा तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. धुराचे लोळच्या लोळ उठत असल्याचे बघून, आसपासच्या शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र जवळपास विहीर, बोरवेल नसल्याने पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. शिवाय विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने आग विझवता आली नाही. विशेष म्हणजे सर्व ऊस तोडणीसाठी परिपक्व झाले होते. अनेक शेतकºयांनी ऊस तोडणीसाठी इतर कारखान्यांना भेट देऊन व्यवहारदेखील केले होते. थोड्याच दिवसात तोडणी होऊन चार पैसे पदरात पडतील, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र लाखो रु पये खर्च करून आज सर्व अपेक्षांची राख झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. लाखो रु पयांचे नुकसान झालेले आहे भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गोदाकाठ भागात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. याच भागात विद्युत पुरवठा करणाºया तारा पसरलेल्या आहे तीन ते चार दशके जुन्या झालेल्या तारा आज धक्का बसला की तुटतात, असे शेतकरी सांगतात, मात्र यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. ऊसतोडणीसाठी आलेला असताना तालुक्यातील कारखाने बंद असल्याने दुसºया कारखान्यांच्या पाया पडावे लागत असल्याने ऊसतोडणीसाठी उशीर झाला आहे. त्यामुळे आजच्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी
- रामा रायते.
शेतकरी, शिंगवे