मनमाडला कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:56 PM2020-09-09T22:56:51+5:302020-09-10T01:14:20+5:30

मनमाड: अभिनेत्री कंगना रणावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यचे पडसाद मनमाड शहरात उमटले. शहर शिवसेनेच्या वतीने एकात्मता चौकात निदर्शने करून कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Burning of the symbolic statue of Manmadala Kangana | मनमाडला कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

मनमाड येथे कंगना रणावतच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे आंदोलन : वादग्रस्त वक्तव्याचे उमटले पडसाद

मनमाड: अभिनेत्री कंगना रणावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यचे पडसाद मनमाड शहरात उमटले. शहर शिवसेनेच्या वतीने एकात्मता चौकात निदर्शने करून कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
कंगना महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप करत शिवसैनिकांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई पोलिसांचा अपमान तसेच मुंबईला पाकिस्तानची उपमा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख या कंगनाच्या भाष्यावर शिवसैनिकांनी आक्षेप घेतला. यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, नगरसेवक लियाकत शेख, जाफर मिर्झा, संजय कटारिया, मुराद शेख, योगेश इमले, संगीता बागुल, रेणुका जयस्वाल, विद्या जगताप यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

 

Web Title: Burning of the symbolic statue of Manmadala Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.