नाशिकरोड रेल्वे स्थानकावर बर्निंग ट्रेन; पार्सल डब्याला आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 11:58 AM2022-11-05T11:58:21+5:302022-11-05T11:59:32+5:30
Nashik Road railway station : शालिमार एक्सप्रेसच्या इंजिनच्या पाठीमागील पहिल्या पार्सल डब्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
- मनोज मालपाणी
नाशिक- नाशिकरोडरेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आज सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास आलेल्या शालिमार- एलटीटी या शालिमार एक्सप्रेसच्या इंजिनच्या पाठीमागील पहिल्या पार्सल डब्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आज सकाळी रेल्वे फलाटावर आल्यावर आग लागल्याचे लक्षात आले त्या पार्सल डब्यात मोठ्या प्रमाणात नवीन कपडे लागते भरलेले होते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ नाशिक रोड अग्निशामक दलाला पाचारण करून बोगीला लागलेली आग विझवण्याचे काम हाती घेतले होते. रेल्वेच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग लागलेल्या बोगीला शालीमार एक्सप्रेस पासून वेगळे करण्यात आले.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शालिमार
— Lokmat (@lokmat) November 5, 2022
एक्सप्रेसला आग, सुदैवाने जीवितहानी टळली!https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/IYhDwpfRRv
तब्बल दोन तासापासून आग विझविण्याचे काम सुरू होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर हावडा एक्सप्रेस एक तास रोखून धरण्यात आली होती. तर गोदावरी एक्सप्रेस शिर्डी दादर बनारस एलटीटी या रेल्वे गाड्या ओढा कसबे सुकेने येथे थांबविण्यात आल्या होत्या.