निफाड तालक्यात साडेतीन एकरावरील ऊस जळून खाक, शॉटसर्कीटने लागली आग लागून लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:53 PM2017-12-18T15:53:57+5:302017-12-18T16:03:11+5:30
नाशिक : निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द शिवारातील शेतकरी बाळासाहेब एकनाथ गामणे यांच्या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील उभ्या ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. शेतात महावितरणच्या असलेल्या डीपीवर शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली. सदर जळालेल्या पीकांचे नुकसानाची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चेहडी खुर्द शिवारात गामणे यांचे शेती असून, यातील साडेतीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड होती. सदर ऊस पीकाची तोडणीसाठी रितक्षा होती. मात्र रविवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील डीपीवर शॉटसर्कीट झाली, यात संपूर्ण ऊस पीक जळून खाक झाला. ऊसाला लाग लागल्याचे कळताच, आजू-बाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीचे स्वरूप भयान असल्याने सर्व पीक काही क्षणात खाक होऊन गेले. यापूर्वीही सन २००८ मध्ये शेतात असलेल्या डीपीमध्ये शॉटसक्रीट होऊन पीक जळल्याची घटना घडली होती. त्यामुळे डीपी बदलाची मागणी महावितरण यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, महावितरणकडून याकडे दुर्लक्ष झाले. या घटनेनंतर गावचे सरपंच किरण सानप, माजी सरपंच दशरथ रूमणे यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली. सोमवारी (दि.१८) सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी जळालेल्या क्षेत्राची पाहणी करून, त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. पीक जळाल्याने लाखो रूपयांची हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांस मदत द्यावी अशी मागणी परिसकरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
महावितरणचे दुर्लक्ष
आग लागू ऊस जळालेल्या शेतातील डीपी दुरूस्तीबाबब ग्रामपंचायतीतर्फे महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामपंचायतींने दोनदा पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र,महावितरणने दुर्लक्ष केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चेहडी खुर्द ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.