बुरुंडी धबधबा विकासाच्या प्रतिक्षेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:04 PM2020-09-17T16:04:50+5:302020-09-17T16:06:01+5:30
पेठ -तालुक्यातील शेवखंडी परिसरातील राशी नदीवर नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुंडी धबधबा पर्यटनस्थळ विकसित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पंचायत समिती अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नुकतीच या भागाची पाहणी करून विकासाबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.

शेवखंडी गावापासून जवळच असलेला हा निसर्गरम्य धबधबा अनेक वर्षापासून दुर्लक्षित असून या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित केल्यास स्थानिक बेरोजगारांना रोजगारासोबत पर्यटकांनाही याचा आनंद घेता येणार आहे. मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यंत जाणारी पायवाट, वाहनतळ तसेच वनविभागाच्या हद्दीत वनौषधी बाग विकसित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यासंदर्भात पंचायत समितीचे सभापती विलास अलबाड यांचे उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. वनविभागाच्या परवानगी नंतर तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत पर्यटनस्थळ विकास करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, बाजार समिती संचालक शाम गावीत,उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, पंचायत समिती सदस्य तुळशिराम वाघमारे, सुरेश पवार, दिलीप चौधरी, मोहन कामडी, गणेश शिरसाठ, इवद चे उपअभियंता अनिल भडांगे, भगवान पाडवी, मनोहर मोंढे, सरपंच हरिभाऊ लहारे ,सदस्य आंबादास भुसारे , गणपत गावित, निवृत्ती भोये , रामदास चौधरी, प्रकाश चौधरी, योगेश चौधरी, ग्रामसेवक दुर्गादास बोसारे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.