वीरगावजवळ बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:03 PM2018-07-03T23:03:10+5:302018-07-03T23:04:52+5:30
वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगत वसलेल्या वीरगाव या गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नुकतीच गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यमार्गाने जाणाऱ्या वाहनांवर वीरगाव फाट्यानजीक काही अंशी अंकुश राहावा यासाठी वीरगाव येथील नागरिकांच्या आग्रहास्तव हे गतिरोधक संबंधित विभागाकडून गत चार ते पाच दिवसांपूर्वीच उभारण्यात आले आहेत; मात्र गतिरोधक उभारल्यानंतर या भागात पांढरे पट्टे व फलक संबंधित विभागाकडून न लावण्यात आल्याने येथे अनेक वाहनचालकांना अडचणींचाच सामना करावा लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचा आरोप वाहनचालकांसह वीरगाववासीयांनी केला आहे.सुदैवाने जीवितहानी नाहीमंगळवारी दुपारी नाशिककडून नंदुरबारकडे जाणाºया शिवशाही बसचा याच ठिकाणी तिहेरी अपघात झाला असून, यात अल्टो कारचालकासह शिवशाही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गतिरोधकाजवळ पुढे चालणाºया ट्रकने अचानक वेग कमी केल्याने शिवशाही बस व पाठीमागून येणारी अल्टो कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.