नाशिक महापालिकेत बस कंपनीच्या ठरावावरून गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 02:44 PM2019-01-19T14:44:21+5:302019-01-19T14:50:27+5:30
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रसतावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनी ऐवजी परिवहन समिती स्थापन करावी तीच कायद्यात तरतूद आहे असे त्यावेळी नमुद केले आणि महापौर रंजना भानसी यांनी तशी घोषणाही केली होती. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने बस सेवेलाच विरोध केला होता. परंतु यांसदर्भातील कोणतीही नोंद त्या सभेत घेण्यात आली नाही.
नाशिक - महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतुक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महसभेत गोंधळ घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून राष्टÑगित सुरू केले.
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रसतावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनी ऐवजी परिवहन समिती स्थापन करावी तीच कायद्यात तरतूद आहे असे त्यावेळी नमुद केले आणि महापौर रंजना भानसी यांनी तशी घोषणाही केली होती. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने बस सेवेलाच विरोध केला होता. परंतु यांसदर्भातील कोणतीही नोंद त्या सभेत घेण्यात आली नाही.
सप्टेंबर महिन्याचे इतिवृत्त शनिवारी (दि.१९) महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होेते. दुपारी बारा वाजता सभेचे कामकाज सुरू होताच राष्टÑवादीचे गजानन शेलार यांनी त्यास आक्षेप घेतला. महापौरांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. यामुळे शेलार अधीकच आक्रमक झाले आणि त्यांनी पीठासनावर धाव घेतल्याने गोंधळ सुरू झाला. महापौर रंजना भानसी त्यांनी त्यास पीठासनावरून खाली जाण्यास सांगितले परंतु ते खाली तर उतरले नाहीत उलट राजदंडालाच हात घातल्याने महापौरांनी तातडीने सर्व विषय मंजुर झाल्याचे जाहिर करून सभा गुंडाळली.
महापौर भानसी यांनी सभेच कामकाज गुंडाळल्याने विरोधकांनी घोषणाबाजी केली दादागिरी नही चलेगी, महापौरांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रतिमहासभा घेण्याचे देखील ठरले. गजानन शेलार तसेच अपक्ष नगसेवक मुशीर सय्यद यांनी सर्वांना इतिवृत्ताच मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात असल्याचे सांगितले. तथापि, विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू असतान कॉँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी मात्र गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांवर ही सभा मॅनेज असून जाणिवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप केला. त्यामुळे शेलार आणि पाटील यांच्यातच जुंपली. हा वाद एकेरीवर तर आलाच परंतु शेलार पीठासन सोडून पाटील यांच्या दिशेने धावले. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते तसेच अन्य सर्व नगरसेवकांनी शेलार यांनी समाजवले. तर सर्वपक्षीय नगरसेविकांनी मात्र हेमलता पाटील यांची बाजु घेत त्यांना समजावले.