मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन युवकांना बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:19 PM2021-01-29T12:19:33+5:302021-01-29T12:19:43+5:30

पिंपळगाव बसवंत : मॉर्निंग वॉक करीता जात असतांना बेदारकपणे बस चालविणाऱ्या अज्ञात बस चालकाने दोन जणांना चिरडले. त्यातील शिवाजी नगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यु झाला तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी आहे.

The bus crushed two young men on their way to a morning walk | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन युवकांना बसने चिरडले

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन युवकांना बसने चिरडले

Next

पिंपळगाव बसवंत : मॉर्निंग वॉक करीता जात असतांना बेदारकपणे बस चालविणाऱ्या अज्ञात बस चालकाने दोन जणांना चिरडले. त्यातील शिवाजी नगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यु झाला तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी आहे. तर सोमनाथ गायकवाड बचावला थोडक्यात बचावला. ही घटना रिलायन्स पेट्रोल पंप मुबंई महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता घडली.यात अज्ञात बस फरार असून चालकाविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पिंपळगाव शहरातील वैभव,राकेश,सोमनाथ हे दररोज प्रमाणे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकवर निघाले असता रिलायन्स पेट्रोल पपंजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात बसने निष्काळजीपणे,भरघाव बेदारकपणे बस चालवत पाठीमागून तिघांना जोराची ठोस मारली. जखमी अवस्थेत असणाऱ्या दोघांना दवाखान्यात न नेता बस चालक बस घेऊन फरार झाला. या अपघातात परिसरातील शिवाजी नगर कोळीवाडा येथे राहणाऱ्या वैभव दायमा या युवकाच्या डोक्याला चेहऱ्याला व कंबरेला आणि पोटाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर राकेश वाघाले गंभीर जखमी असून सोमनाथ गायकवाड हा बचावला आहे. गर्दीच्या मदतीने जखमीना रुग्णालयातयात दाखल केले असता वैभव दायमा यास डॉक्टरांनी मृत घोषित केले तर राकेश बाळासाहेब वाघाले यास उचरासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित वाघ व योगेश बुरगुले करत आहे.
---------------------
अनेकांचा जीव वाचला...
अज्ञात बस चालक अपघात करून फरार होत असताना अत्यन्त भरधाव वेगाने बस नेत असल्याने मॉर्निग वॉक व मोटारसायकलवर जाणाऱ्या इतर अनेकांचा जीव टांगणीला होता.घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनीं या बस चालकाचा शोध घेत चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The bus crushed two young men on their way to a morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक