बसचालकाला मारहाण भोवली; वर्षभराचा रिक्षाचालकाला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:32+5:302021-04-01T04:15:32+5:30
बसचालक सुभाष रामू देवकर हे ११ डिसेंबर २००९ रोजी सकाळी शालिमार ते देवळाली कॅम्प या मार्गावरून शहर बसद्वारे प्रवासी ...
बसचालक सुभाष रामू देवकर हे ११ डिसेंबर २००९ रोजी सकाळी शालिमार ते देवळाली कॅम्प या मार्गावरून शहर बसद्वारे प्रवासी वाहतूक करीत होते. त्यावेळी अनिल याने त्याची रिक्षा (एमएच १२ झेड ७६४९) बसला आडवी करत बस रोखली आणि कुरापत काढून सुभाष यांना मारहाण करीत धमकावले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन उपनिरीक्षक आर. बी. रसेडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. वाय. सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला. साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी अनिल कोरडे यास या गुन्ह्यात दोषी धरले. वर्षभर कारावास व तीन हजारांचा दंड ठोठावला आहे.