बसचालकाला मारहाण, पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 03:23 PM2019-09-30T15:23:54+5:302019-09-30T15:24:40+5:30
घोटी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला रस्त्यात अडवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
घोटी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला रस्त्यात अडवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान ही घटना मुंबई आग्रा महामार्गावर घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत चालक म्हणून दिलीप शिवराम पवार हे काम करतात. एचएच ४० एन ८८२६ या क्र मांकाची बस घेऊन सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ते घोटी शिवारातून मुंबई आग्रा महामार्गावर वाहक आणि प्रवाशी घेऊन निघाले होते. यावेळी मागील बाजूने येणारे इनोव्हा वाहन क्र मांक एमएच १५ सीएम ९३९९ यातील चालकाने पुढे जाण्यासाठी साईड मागितली. बसचालकाने त्यांना साईड दिल्यानंतरही त्याने बसला आपले इनोव्हा वाहन आडवे केले. यानंतर दिलीप शिवराम पवार यांना त्यांच्या वाहनातील चालक आणि इतर चार जणांनी दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरु वात केली. त्यांना लाथा बुक्के मारून बेशुद्ध केले. याबाबत बसचालकाने घोटी पोलीस ठाण्यात इनोव्हाचा चालक आणि इतर चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणि इतर गुन्ह्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.