कामगाराला वीजतारांचा बसला जोराचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:00 AM2017-08-22T00:00:30+5:302017-08-22T00:38:21+5:30
जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वारबाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम पूर्ण होऊन घरावर लोखंडी पत्रे बसवित असताना तरुण कामगाराला लोंबकळणाºया वीजतारांचा शॉक बसला. सुदैवाने वीजतारांना रबर कोटिंग असल्यामुळे विजेच्या प्रवाहाचा फटका सदर युवकाला बसला नाही व तत्काळ तो पत्र्यावर फेकला गेला.
नाशिक : जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वारबाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम पूर्ण होऊन घरावर लोखंडी पत्रे बसवित असताना तरुण कामगाराला लोंबकळणाºया वीजतारांचा शॉक बसला. सुदैवाने वीजतारांना रबर कोटिंग असल्यामुळे विजेच्या प्रवाहाचा फटका सदर युवकाला बसला नाही व तत्काळ तो पत्र्यावर फेकला गेला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, घोडेस्वारबाबा चौकामध्ये नव्याने बांधकाम झालेल्या दुमजली घरावर नईम बशीर शेख (३०, रा. कथडा) हा युवक फॅब्रिकेशन करून लोखंडी पत्रे बसवित होता. यावेळी त्याचा संपर्क अवघ्या एक फुटावर लोंबकळणाºया महावितरणच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांशी आल्याचे प्रत्यक्षदर्शींसह शेख याचे म्हणणे आहे. यामुळे त्यास वीज प्रवाहचा धक्का लागून तो फेकला गेला. सदर बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ त्यांनी घरावर धाव घेऊन शेख यास हलवून त्याच्या तोंडावर पाणी मारले असता ते शुद्धीवर आले. युवकांनी त्यास खाली आणत उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविल्यामुळे प्राण वाचले.
चार दिवसांपूर्वीच शहरातील इंदिरानगर भागात विद्युत खांबावर दुरुस्ती करताना शॉक लागून महावितरणच्या तरुण कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती.