थेट गोदापात्रात शिरली प्रवासी बस, मोठी दुर्घटना टळली

By admin | Published: November 9, 2016 12:34 PM2016-11-09T12:34:57+5:302016-11-09T12:34:57+5:30

वडोदराहून नाशिकमध्ये देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन येणारी एक खासगी बस थेट गोदावरी नदीपात्रात शिरली.

A bus passes directly into the godown, a big accident is avoided | थेट गोदापात्रात शिरली प्रवासी बस, मोठी दुर्घटना टळली

थेट गोदापात्रात शिरली प्रवासी बस, मोठी दुर्घटना टळली

Next

ऑनलाइन लोकमत

पंचवटी (नाशिक), दि. 9 - वडोदराहून नाशिकमध्ये देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन येणारी एक खासगी बस थेट गोदावरी नदीपात्रात शिरली. बसला ब्रेक न लागल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. म्हसोबा महाराज पटांगण नदीपात्राजवळची ही घटना घडली आहे. 
 
सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच बसमध्ये चालकाशिवाय कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. बस नदीपात्रात अडकल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी झाले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर फायर ब्रिगेडने नदीपात्रात अडकलेली ही बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. 
 
कशी घडली घटना?
वडोदरा येथील पाटलीपुत्र कंपनीची जी. जे. 7428 या क्रमांकाची ही खासगी बस भाविकांना घेऊन पंचवटीमध्ये येत होती. यावेळी चालक अतुल माथीने बस म्हसोबा महाराज पटांगणवर उभी केली.
 
यानंतर, सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास माथीने बस सुरू केल्यानंतर ती मागे जाऊ लागली, याचवेळी बसला ब्रेकदेखील न लागत असल्याने ती थेट नदीपात्रात उतरली.
 
सुदैवाने नदीपात्रात पाण्याचा मोठा प्रवाह नव्हता तसेच सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

 

Web Title: A bus passes directly into the godown, a big accident is avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.