एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी धावणार बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:10+5:302021-03-15T04:14:10+5:30

नाशिक : राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू ...

Bus running for MPSC students | एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी धावणार बस

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी धावणार बस

Next

नाशिक : राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू असल्याने अशा वातावरणात २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यंसाठी बसेस पुरविणार आहे.

जिल्ह्यातील ४६ केंद्रांवर सुमारे १८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी नाशिकमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नियोजन केले जात आहे. सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. शनिवार आणि रविवारी तर संपूर्ण बंद पुकारण्यात आलेला आहे. खासगी प्रवासी वाहनांवरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे रविवारी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महामंडळाने बसेसची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने प्रत्येकाला आपली काळजी घ्यावी लागत आहे. प्रशासनाने पुकारलेल्या बंदला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा वातावरणात एमपीएससी परीक्षा होणार असल्याने परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याच्या सुचना राज्य सेवा परीक्षा मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. त्यांना विलंब होऊ नये तसेच कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची काळजी घेत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रांवर पोहोचविण्यासाठी नियमित बसेसबरोबरच विशेष आणि जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सुमारे २०० बसेसचे नियोजन केले जाणार असल्याचे समजते. मागणी अधिक वाढल्यास लागलीच बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

बसेस उपलब्ध करून देताना प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. बसेसचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर आणि सुरक्षित प्रवासासाठीचे नियोजन सोमवार, दिनांक १५ रोजी केले जाणार असून, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या एस. टी.कडून सर्व प्रकारच्या नियोजनाला सुरूवात करण्यात आली आहे.

-

--इन्फो--

एकूण विद्यार्थी

१८,२६३

परीक्षा केंद्रे

४६

बसेसची अंदाजे संख्या

२००

Web Title: Bus running for MPSC students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.