येवल्यात प्रवाशांअभावी बससेवा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:22 PM2020-05-22T21:22:20+5:302020-05-22T23:47:49+5:30
येवला : कोरोना संकटामुळे दोन महिन्यांपासून ठप्प झालेली बससेवा शुक्रवारपासून सुरू झाली पण येवला बसस्थानकावरून एसटी बससेवा प्रवाशांअभावी रद्द करावी लागली.
येवला : कोरोना संकटामुळे दोन महिन्यांपासून ठप्प झालेली बससेवा शुक्रवारपासून सुरू झाली पण येवला बसस्थानकावरून एसटी बससेवा प्रवाशांअभावी रद्द करावी लागली.
शासनाच्या आदेशाने तब्बल दोन महिन्यानंतर लालपरी रस्त्यावर धावणार होती. बससेवा सुरू करण्याबाबत संबंधीत वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर येवला आगाराने बसेस सॅनीटाइज करून सज्ज ठेवल्या होत्या. येवला-नांदगाव, येवला-लासलगाव, येवला-निफाड व येवला-मनमाड या चार मार्गावर दोन एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुपारच्या ३ वाजेपर्यंत प्रवाशीच बसस्थानकावर फिरकले नसल्याने अखेर या बसगाड्या रद्द करण्यात आल्या. दहा वर्षाच्या आतील लहान मुलांना व ज्येष्ठांना मात्र या प्रवास सुविधेचा लाभ घेता येणार नसून प्रवाशी वर्गाला सोशल डिस्टंन्सिंग पाळत मास्क वापर आवश्यक आहे.
दरम्यान, शनिवारी, (दि. २३) पुन्हा येवला-नांदगाव, येवला-लासलगाव, येवला-निफाड व येवला-मनमाड या चार मार्गावर दोन एसटी बसेस सोडण्याचे नियोजन आहे. प्रवाशीवर्गाच्या मागणीप्रमाणे बसफेऱ्या वा गाड्या वाढविण्यात येतील असे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी सांगितले.