संपामुळे बससेवा ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:17 AM2017-10-18T00:17:29+5:302017-10-18T00:17:34+5:30

सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेल्या या संपामुळे मूळगावी सण साजरा करण्यासाठी जाणाºया सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले.

Bus service jam due to the strike! | संपामुळे बससेवा ठप्प!

संपामुळे बससेवा ठप्प!

Next

नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेल्या या संपामुळे मूळगावी सण साजरा करण्यासाठी जाणाºया सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. पंधरवड्यापूर्वी अगोदर संपाची नोटीस देण्यात आली होती; मात्र सरकारने तोडगा काढला नाही. यामुळे संपाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.  एसटी कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला शहरात शिवसेनाप्रणीत एसटी कामगार सेना वगळता सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यामुळे नाशिक विभागातील सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.  सकाळ सत्रातील ३७ बसेस दुुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावत होत्या. एकूणच सकाळच्या सत्रातही केवळ तीस टक्के प्रवासी वाहतूक निमाणी स्थानकातून झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत सर्वच बसेसला ‘ब्रेक’ लागलेला होता. निमाणी स्थानकातून सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवासी वाहतुकीच्या आठशे फेºया होतात. एकूणच शहर प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. तसेच लांब पल्ल्याची वाहतूकही बंद होती.  महामार्ग, जुने मध्यवर्ती बसस्थानक, नवीन मध्यवर्ती बसस्थानक, नाशिकरोड स्थानक यांमध्ये केवळ बसेसच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. दुपारी बारा वाजेनंतर सर्वच स्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला होता.  एकूणच शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. शहरातील रस्त्यावर डोळ्यांना ‘लाल परी’ दिसेनासी झाली होती. बससेवा ठप्प झाल्याने प्रवासी वाहतुकीची सर्व भिस्त खासगी वाहतुकीवर होती. काळ्या-पिवळ्या जीप, रिक्षा, ट्रॅव्हल्सचा आधार घेत प्रवाशांनी आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र हे करताना गैरसोयीचाही प्रवाशांना सामना करावा लागला.
‘डबल बेल’ मिळणे अवघड
 सातवा वेतन आयोग एसटीच्या चालक-वाहकांना लागू करणे शक्य होणार नाही, अशी लेखी माहिती एसटीच्या कामगार संघटनेला सरकारक डून देण्यात आली. त्यानंतर संपाची हाक संघटनेने दिली. चालक-वाहकांनी पुकारलेला हा संप बेमुदत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एकू णच जोपर्यंत सरकारकडून एसटी चालक-वाहकांसाठी सातव्या वेतन आयोगाबाबत सकारात्मक चर्चा होत नाही तोपर्यंत ‘एसटी’ला ‘डबल बेल’ मिळणे कठीण होणार आहे.
सकाळी केवळ ३० टक्के वाहतूक; दुपारनंतर चाके थांबली
लांब पल्ल्यावर चालणारे बस कर्मचारी मध्यरात्री व पहाटे शहरात दाखल झाले. त्यानंतर मात्र त्यांनी शहरातून पुढील फेरी सुरू न करता संपामध्ये सहभाग घेतला. महामार्ग व नवीन मधवर्ती बसस्थानक आवारातील चालक-वाहक विश्रामगृहात कामगारांनी ‘विश्राम’ केल्याने जागा अपुरी पडत होती.   प्रवाशांना वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा आधार होता. रिक्षा, काळ्या-पिवळ्या जीप, खासगी ट्रॅव्हल्सद्वारे नागरिक प्रवास करताना दिसून आले. शहरातील सीबीएस, शालिमार, पंचवटी आदी परिसरातून रेल्वेस्थानकाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रिक्षा धावत होत्या. रिक्षाचालकांच्या पथ्यावर संप पडल्याने क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक झाली.
शहरातील पंचवटी आगारामधून सुटणाºया शहर बस वाहतुकीच्या सुमारे तीन हजार फेºया रद्द झाल्या होत्या. सकाळच्या सत्रात केवळ ३७ बसेस निमाणीमधून बाहेर पडल्या. सकाळच्या सत्रात तीस टक्के शहर वाहतूक सुरू होती; मात्र दुपारपासून शहर बससेवेची चाके पूर्णपणे थांबली. शहर बससेवेची ज्यांच्यावर मदार आहे असे एक हजार कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने सरासरी पंधरा ते वीस लाखांचे उत्पन्न बुडाले. १४० बसेसपैकी दुपारनंतर एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही.
नाशिक आगार-१ च्या कर्मचाºयांनी बाहेरगावाहून आलेल्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसच्या चालक-वाहकांसाठी महामार्ग, आगार-१, नवीन मध्यवर्ती बसस्थानक येथे भोजनाची व्यवस्था करून दिली होती.   स्थानिक कर्मचाºयांनी आपसामध्ये वर्गणी काढून भोजनाचे नियोजन केल्याची माहिती शहराध्यक्ष विजय पवार यांनी दिली. रात्रीच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Bus service jam due to the strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.