शहरात बससेवा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:39 AM2018-07-26T00:39:40+5:302018-07-26T00:39:54+5:30

मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच अन्य विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

 Bus services in the city disrupted; Passengers' arrival | शहरात बससेवा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

शहरात बससेवा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

googlenewsNext

पंचवटी : मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच अन्य विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारपर्यंत बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रिक्षाने तसेच पायी प्रवास करून इच्छितस्थळी जावे लागले. एसटीची शहरातील सेवा विस्कळीत झाल्याने अंदाजे लाखो रु पयांचा फटका एसटी महामंडळाला बसला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  काल मंगळवारी (दि.२४) सायंकाळी काही आंदोलनकर्त्यांनी एसटी बसेसच्या काचा फोडून नुकसान केल्याने व त्यातच बुधवारी नाशिक बंदची हाक दिल्याने एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी बुधवारी पंचवटी बस आगारातून एकही बस शहरात फेरीसाठी काढण्यात आलेली नव्हती. पंचवटी आगारात १००हून अधिक बसेस संख्या असून, बुधवारी दुपारपर्यंत एकही बस शहरातील रस्त्यावर धावली नाही.  बुधवारी सकाळपासूनच शहरातील बससेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. परिसरातील अनेक ठिकाणच्या बसथांब्यांवर प्रवाशांनी गर्दी केली होती, मात्र बससेवा बंद असल्याचे समजतात त्यांनी रिक्षाने पुढचा प्रवास केला.
रिक्षाचालकांची चंगळ
शहरातील एसटी बससेवा विस्कळीत झाली होती. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावा लागला. रिक्षाचालकांनी बस बंदचा पुरेपूर फायदा घेत रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून नियमांची उघडपणे पायमल्ली केली असल्याचे चित्र शहरभर दिसून आले.

Web Title:  Bus services in the city disrupted; Passengers' arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.