ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:30+5:302021-07-10T04:11:30+5:30
नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला आता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अधिक सक्षम करता ...
नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला आता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अधिक सक्षम करता येणार आहे. महामंडळाने नेहमीच दर्जेदार प्रवासी सेवा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. शहरातील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी झाल्याने आता ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अधिक चांगली प्रवासी सेवा देता येऊ शकणार आहे.
नाशिक महापालिकेने प्रवासी वाहतूक सुरू केली ही आनंदाचीच बाब आहे. बस कुणाची यापेक्षा शेवटी प्रवाशांना सुविधा मिळणे महत्त्वाचे असून, त्यादृष्टीनेच महामंडळाने आजवर प्रवासी वाहतूक केली आहे. आजवर शहर आणि ग्रामीण भागात परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली आहे. आता शहरातील भार कमी झाल्यामुळे आम्हाला ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.
ग्रामीण भागातील भागात आम्हाला अधिक सुविधा द्यायच्या आहेत. नाशिक महानगरातील प्रवासी वाहतुकीवरील यंत्रणा आता आम्ही ग्रामीण भागासाठी वापरणार आहोत. परंतु, सध्या काेेरोनाचा निर्बंध असल्यामुळे याबाबत काही मर्यादादेखील आलेल्या आहेत. परंतु, जसजसे निर्बंध कमी होतील त्याप्रमाणे नाशिकमधून ग्रामीण भागासाठी अधिक चांगली आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
महापालिकेने सुरू केलेल्या बससेवेला आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांनी आधुनिकतेची कास धरून बसेस रस्त्यावर आणलेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वापर सर्वसामान्य नागरिक करीत असल्याने या तंत्रज्ञानाचा प्रवाशांना लाभच होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाची जबाबदारी असल्याने ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त बसेसच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.