बसस्थानकात पेटल्या चुली
By Admin | Published: June 5, 2017 12:02 AM2017-06-05T00:02:40+5:302017-06-05T00:24:59+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणेच्या शेतकऱ्यांनी संपादरम्यान अनोखे गांधीगिरी आंदोलन सुरु केले आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणेच्या शेतकऱ्यांनी संपादरम्यान अनोखे गांधीगिरी आंदोलन सुरु केले आहे. एक गाव एक चूल असे या आंदोलनाचे स्वरूप असून, रविवारी दुपारपासून डांगसौंदाणे गावातून या आंदोलनाची सुरु वात करण्यात आली.
जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला महिलांनी साडी चोळी व बांगड्याचा आहेर देवून त्यांच्या पुतळ्याचे महिलांच्या हस्ते दहन करण्यात आले.संपूर्ण गावातील गावकऱ्यांनी एकत्र येत दुपारी एकत्र स्वयंपाक केला. आणि एकत्रच भोजन करून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या शासन पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे नागरिकांनी सांगितले .
डांगसौंदाणे येथील सर्व शेतकरी कुटुंबांनी एकत्र येऊन सामूहिक स्वयंपाक व एकत्र भोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानक आवारात चुली पेटवून पिठलं-भाकरीचा स्वयंपाक करण्यात आला. तेथेच सगळ्यांनी एकत्र जेवणही केले. शेकडो पुरु ष शेतकऱ्यांसह महिलांचीही संख्या लक्षणीय होती. या आंदोलनाचे लोन आता गावागावत पसरण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी कुटुंबीयांनी सुरु केलेल्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे डांगसौंदाणे गाव चांगलंच चर्चेत आल आहे.