उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:54 AM2018-10-07T00:54:41+5:302018-10-07T00:55:05+5:30
येवला : तालुक्यातील उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एसटी महामंडळाची बस उलटून अपघात झाला. ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ७५ प्रवासी होते.
येवला : तालुक्यातील उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर एसटी महामंडळाची बस उलटून अपघात झाला. ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ७५ प्रवासी होते.
तालुक्यातील बोकटे येथे येवला आगाराची बस मुक्कामी जात असते. सकाळी ६ वाजता बोकटे वरून निघते. शनिवारी (दि.६) सकाळी ६ वाजता सदर बस (क्र. एमएच १४ बीटी ०५५३) बोकटे येथून निघाली. उंदीरवाडी-बोकटे रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून झालेल्या अपघातात ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. यावेळी बसमध्ये एकूण ७५ प्रवासी होते. यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी जि. प. सदस्य महेंद्र काले, शिवसेना नेते संभाजी पवार, मकरंद सोनवणे, बाबा डमाळे, सचिन कळमकर, दिलीप जाधव, किशोर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमींना येवला,अंदरसूल ग्रामीण रु ग्णालयासह काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत येवला आगारात विचारणा केली असता रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने बसचा पाटा तुटला व बस उलटल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी बस सुटण्यासाठी उशीर झाल्याने चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला असे सांगितले.
प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बोकटे-उंदीरवाडी रस्ता हा ८ ते ९ किमीचा आहे. २ वर्षांपूर्वी ५ ते ६ किमीपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे; परंतु पुढील २ ते ३ किमीचे काम आजही बाकी आहे.