लोकसेवा आयोग परीक्षेसाठी शहरातून बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:04 PM2020-09-29T23:04:15+5:302020-09-30T01:10:15+5:30
नाशिक: लोकसेवा आयोगामार्फत येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाने पुणे येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नाशिकमधील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुणे केंद्रांवर होणार आहे अशाा विद्यार्थ्यांसाठी नवीन सीबीएस येथून बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

संघ लोकसेवा आयोगाच्या सिव्हील सर्विर्सस (पुर्व ) परीक्षेसाठी उपस्थित राहू शकणाºया विद्यार्थ्यांना पुणे येथील केंद्रावर परीक्षेला जाण्यासाठी नाशिक विभागीय एस.टी. महामंडळाने बसेससेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी उमेदवरांना आगोदर बुकींग करावे लागणार आहे. रविवार दि. ४ रोजी रात्री १२, १२,४५,०१, आणि ०१.१५ या वेळेत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सदर बसेस ४ तारखेला पुण येथे सकाळी ६ वाजता पोहचतील या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.