चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:05+5:302021-05-27T04:16:05+5:30
राज्यातील कोरेानाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना ...
राज्यातील कोरेानाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना एस.टी. बसमधून प्रवास करता येणार नाही. गर्दीची ठिकाणे टाळून काेरोनाचा प्रसार रोखण्याचा भाग म्हणून बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ १५ टक्के क्षमतेने कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आलेले आहेत.
जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या बसेस या केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच पाठविल्या असल्याचे नाशिक विभागीय एस.टी. वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. दैनंदिन प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार संबंधित मार्गावर तसेच जिल्ह्यासाठी बसेस सोडल्याा जात आहे. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करण्यात आलेला नाही. महामंडळाला दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या वेतनाचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे.
--इन्फो--\
शहरातील प्रवासी बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगून राज्य परिवहन महामंडळाने शहर बसेस चालविणे यापूर्वीच कमी केले आहे. महामंडळाला होणारा तोटा पाहता कोरोनाच्या परिस्थितीनंतरही शहर बसेस चालविण्याबाबत नाशिक विभागीय महामंडळाची तयारी नसल्याचे समजते. त्यामुळे शहर बससेची अनिश्चितता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे.