चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:07+5:302021-05-29T04:12:07+5:30

राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस चालविल्या ...

Buses for essential services only in four talukas | चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस

चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस

Next

राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस चालविल्या जात आहेत. बुधवारी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेठ, कळवण, नांदगाव आणि येवला येथेच बसेस सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुणे आणि धुळे येथेदेखील याच कारणास्तव बसेस सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना एस. टी. बसमधून प्रवास करता येणार नाही. गर्दीची ठिकाणे टाळून काेरोनाचा प्रसार रोखण्याचा भाग म्हणून बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ १५ टक्के क्षमतेने कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले आहे.

जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या बसेस या केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच पाठविल्या असल्याचे नाशिक विभागीय एस. टी. वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. दैनंदिन प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार संबंधित मार्गावर तसेच जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जात आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करण्यात आलेला नाही. महामंडळाला दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या वेतनाचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे.

--इन्फो--

शहरातील प्रवासी बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शहर बसेस चालविणे यापूर्वीच कमी केले आहे. महामंडळाला होणारा तोटा पाहता कोरोनाच्या परिस्थितीनंतरही शहर बसेस चालविण्याबाबत नाशिक विभागीय महामंडळाची तयारी नसल्याचे समजते. त्यामुळे शहर बससेची अनिश्चितता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Buses for essential services only in four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.