कळवण आगारात गळक्या बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 05:30 PM2019-08-16T17:30:59+5:302019-08-16T17:30:59+5:30
शिवसेनेचे निवेदन : नवीन बसेस देण्याची मागणी
कळवण - कळवण आगारातील परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. पावसाळ्यात अनेक बसेस गळती लागत असते. शिवाय रात्री-अपरात्री नादुरु स्त होण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी तालुका शिवसेनेने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कळवण आदिवासी बहुल तालुका आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महामंडळाच्या बस शिवाय पर्यायी व्यवस्था नाही. कळवण आगाराच्या अनेक बसेस जुन्या झाल्या आहेत. जवळपास सगळ्याच बसेस पावसाळ्यात गळत आहेत. याशिवाय, दररोज दोन-तीन बसेस रस्त्यात नादुरु स्त होऊन बंद पडतात. त्या मार्गाने दुसरी बस लवकर येत नसल्याने प्रवाशांना रस्त्यात अडकून पडावे लागते. प्रवाशांची अडचण ओळखून कळवण आगाराला नवीन बसचा पुरवठा करण्यात यावा मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख साहेबराव पगार, विधानसभा संपर्कप्रमुख संभाजी पवार, विभागप्रमुख शितलकुमार अहिरे, ग्राहक कक्ष ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय रौंदळ, डॉ पंकज मेणे, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, आप्पा बुटे, युवा सेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, शहरप्रमुख सुनिल पगार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भाऊराव पगार, अशोक जाधव यासह शिवसैनिक व प्रवाशी उपस्थित होते.