जयभवानीमार्गे धावणाऱ्याभगूर बसेस निमाणीपर्यंत
By admin | Published: December 2, 2015 10:34 PM2015-12-02T22:34:24+5:302015-12-02T22:35:48+5:30
जयभवानीमार्गे धावणाऱ्याभगूर बसेस निमाणीपर्यंत
नाशिकरोड : जयभवानी रोडमार्गे दर दोन तासांनी भगूर-शालिमार जाणाऱ्या-येणाऱ्या बसेसच्या फेऱ्या वाढवून दर एक तासाला शालिमारऐवजी निमाणीपर्यंत बसेस सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जयभवानी रोडमार्गे भगूर-शालिमार बसेसच्या फेऱ्या दिवसाला दर दोन तासांनी होत होत्या. तसेच दिवसभरात दोनच बसेस निमाणी बसस्थानकापर्यंत जात होत्या. याबाबत ज्येष्ठ नागरिक राजेंद्रसिंग पाटील, अण्णासाहेब देशमुख आदिंनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच भगूर-शालिमार ऐवजी भगूर-जयभवानी रोडमार्गे निमाणी बसेस सोडण्यात याव्या व दोन तासाऐवजी दर तासाला बस सोडावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. जयभवानी परिसरातील लोकसंख्या कामगार, विद्यार्थी, पालक, महिला आदिंची गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मंगळवारपासून जयभवानी रोडमार्गे जाणाऱ्या-येणाऱ्या बसेस या भगूर-निमाणी व दर तासाला सोडण्यास सुरुवात केली आहे.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीे ज्येष्ठ नागरिकांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन बसेस सुरू केल्याबद्दल विभागीय नियंत्रक यामिनी जोशी, आगार व्यवस्थापक आहिरे, वाहतूक अधीक्षक सांगळे, एसटी कामगार नेते प्रमोद भालेकर यांचा नगरसेवक कोमल मेहरोलिया, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांच्या कार्यालयात सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी राजेंद्रसिंग पाटील, अण्णासाहेब देशमुख, दत्ताराम मते, नारायण डहाळे, किरण देशमुख, दौलत रोकडे, विजय देशमुख, संतोष बडगे, प्रमोद भालेकर, अपसुंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)