महाशिवरात्रीसाठी आजपासून बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:57 PM2020-02-19T23:57:40+5:302020-02-20T00:10:16+5:30

महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत.

Buses starting today for Mahashivratri | महाशिवरात्रीसाठी आजपासून बसेस

महाशिवरात्रीसाठी आजपासून बसेस

googlenewsNext
ठळक मुद्देजादा वाहतूक : त्र्यंबकेश्वरसाठी ७० बसेसचे नियोजन

नाशिक : महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत. यात्रेचा प्रमुख दिवस शुक्रवार (दि.२१) असल्याने या दिवशी सर्वाधिक ५० बसेस विविध आगारांतून धावणार आहेत. त्र्यंबकेश्वर बरोबरच जिल्ह्यातील अन्य दहा ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांसाठीदेखील बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्र यात्रेनिमित्त दरवर्षी महामंडळाकडून भाविकांची प्रवासी वाहतूक केली जाते. त्र्यंबकेश्वरसह सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनाई, सोमेश्वर, दोधेश्वर, कपालेश्वर, सिद्धेश्वर, शिरसमणी, पारेगाव, नागापूर येथील शिवमंदिरांमध्येदेखील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणीदेखील बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वतीर्थ टाकेद आणि त्र्यंबकेश्वरसाठी दि. २० पासून सलग तीन दिवस, तर अन्य ठिकाणी दि. २० आणि २१ अशा दोन दिवसांसाठीच बसेस सोडण्यात येणार आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांना नाशिक आगार-१, नाशिक आगार-२, कळवण, पेठ, पिंपळगाव येथून बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिकमधून दररोज ४५ ते ५० बसेस धावणार आहेत. तसेच अन्य आगारांमधून दोन ते तीन जादा बसेस सोडल्या जातील. दि. २० रोजी २४, २१ रोजी ५० आणि २२ रोजी २४ बसेस सोडण्यात येणार आहेत. भगूर बसस्थानकातून टाकेदसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पिंपळगाव, सिन्नर आणि नाशिक-२ मधूनही बसेस टाकेदला सोडण्यात येणार आहेत. घोटी येथून कावनाई आणि त्र्यंबकेश्वरला बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रा कालावधीत बसस्थानक तसेच तात्पुरत्या स्थानकात तातडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसस्थानकांसाठी काही ठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यात येणार आहे. टाकेद येथे निवारा शेड उभारले जाणार आहे. अनेक ठिकाणी तात्पुरती वीज जोडणीचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाण्याचे टॅँकर्स देण्याची जबाबदारी आगारप्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ठिकाणी टॅँकर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यात्रा कालावधीत राज्य परिवहन महामंडळाकडून जादा भाडे आकारणी केली जाते. त्यानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर प्रौढांना ४० रुपये, तर मुलांना २० रुपये याप्रमाणे भाडे आकारण्यात येणार आहे. इगतपुरी-टाकेद येथूनही ४० रुपये भाडे आकारले जाणार आहे. भगूर-टाकेद ४० रुपये, सिन्नर-टाकेद ८५ रुपये, घोटी-कावनाई १५ रुपये, पंचवटी सोमेश्वर १५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

Web Title: Buses starting today for Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.