आजपासून धावणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:02 PM2020-05-21T22:02:28+5:302020-05-21T23:33:12+5:30

नाशिक : नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागात शुक्रवार (दि.२२) पासून सुमारे ७० बसेस धावणार असल्याने तब्बल दोन महिन्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लॉकडाउन सुरू असल्याने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे प्रवाशांनादेखील बंधनकारक असून, सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच बसेसची सेवा मिळणार आहे.

 Buses will run from today | आजपासून धावणार बसेस

आजपासून धावणार बसेस

Next

नाशिक : नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागात शुक्रवार (दि.२२) पासून सुमारे ७० बसेस धावणार असल्याने तब्बल दोन महिन्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लॉकडाउन सुरू असल्याने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे प्रवाशांनादेखील बंधनकारक असून, सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच बसेसची सेवा मिळणार आहे.
रेड झोन वगळता उर्वरित क्षेत्रामध्ये बससेवा सुरू करण्याबाबत १९ मे रोजीची महाराष्टÑ शासनाचे पत्र असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाने या पत्रान्वये बसेस सुरू करण्याला परवानगी दिलेली आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रामध्ये सर्व नॉन रेडझोनमध्ये बससेवा सुरू केली जात आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीतच बसेस चालविण्यात येणार आहेत. बसमध्ये प्रवाशांना शारीरिक अंतराचे नियम पाळावे लागणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. चालविण्यात येणाऱ्या या बसेस पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून चालविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यांतर्गत बससेवा ही ५० टक्के प्रतिबस आसन क्षमतेवर सुरू करण्यात येत आहे.
---------------------
प्रवाशांची सोय
४भगूर-इगतपुरी, इगतपुरी-त्र्यंबक, त्र्यंबक-इगतपुरी, त्र्यंबक-गिरणारे, गिरणारे-त्र्यंबक, इगतपुरी-टाकेद, टाकेद-इगतपुरी
४कळवण : देवळा, दिंडोरी, सटाणा, सुरगाणा येथून पुन्हा कळवण
४लासलगाव : मनमाड, चांदवड, सिन्नर तेथून पुन्हा लासलगाव
४येवला : नांदगाव, निफाड, मनमाड, लासलगाव पुन्हा येवला
४सटाणा : डांगसौंदाणे, ताहाराबाद, तळवाडा, नामपूर तेथून पुन्हा सटाणा
४पेठ : हरसूल, आहुले, घुबडसाका पुन्हा पेठ
४पिंपळगाव : निफाड, दिंडोरी, वणी, बहादुरी पुन्हा पिंपळगाव
४नांदगाव : मनमाड, येवला, बोलठाण पुन्हा नांदगाव
४मनमाड : नांदगाव, कळवण, येवला, लासलगाव, सटाणा पुन्हा मनमाड
४सिन्नर : लासलगाव, सायखेडा, ठाणगाव पुन्हा सिन्नर
४इगतपुरी : आंबेवाडी ते घोटी, त्र्यंबक पुन्हा इगतपुरी
----------------------
...येथून सुटतील बसेस
४कळवण, लासलगाव, येवला, सटाणा, पेठ, पिंपळगाव, नांदगाव, मनमाड, सिन्नर, इगतपुरी.

Web Title:  Buses will run from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक