ग्रामीण भागात व्यवसाय बंद; मजुरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:59+5:302021-04-10T04:13:59+5:30
सर्वच व्यवसाय बंद असल्याने हाताला काम नसल्याने दररोजच्या जेवणाची भ्रांत कशी भागवायची, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. ...
सर्वच व्यवसाय बंद असल्याने हाताला काम नसल्याने दररोजच्या जेवणाची भ्रांत कशी भागवायची, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाने, ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यात छोटा-मोठा व्यवसाय करणारे व हातावर पोट असणारे अडचणीत सापडले आहेत. मागील वर्षाच्या महामारीतून कसेबसे सावरले असतानाच आता पुन्हा संकटाला सामोरे जाण्याची वेळ आल्याने मजूर, छोटे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यातही सलून व्यवसायदेखील बंद करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या नाभिक समाजाची मोठी अडचण झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी आपली पूर्वीचे दुकाने बंद करून नवीन छोटे -मोठे व्यवसाय सुरू केले होते. परंतु शासनाच्या निर्बंधामुळे पुन्हा व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजीपाला विक्री करण्यास पसंती दिली आहे.