व्यवसायिक अभ्यासक्रम संस्थांना द्यावा लागणार स्वयं मुल्यमापन अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:56+5:302021-06-18T04:10:56+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अथवा संलग्नित हहोऊ इच्छिणाऱ्या अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र,, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, विधी व शिक्षणशास्त्र ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अथवा संलग्नित हहोऊ इच्छिणाऱ्या अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र,, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, विधी व शिक्षणशास्त्र तसेच शारीरिक शिक्षणशास्त्र आदि विविध व्याववसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालये व संस्थांच्या कालमर्यादेसंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मबत्वाचे पत्र काढले असून या पत्रकाद्वारे संबधित महाविद्यालय व संस्थांनी २० जूनपर्यंत स्वयं मुल्यमापन अहवाल सादर करण्याच्या सुचना के्ल्या आहेत. त्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकच्या माध्यमातून संबंधित महाविद्यालयांनी व संस्थांनी या स्वयं मुल्यमापन अहवालासोबतच त्याच नमूद केल्या आवश्यक मुद्यांचे कागदपत्रही लिंकद्वारे अपलोड करून २० जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या सुचना विद्यापीठाचे उपकुलसचील मुंजाजी रासवे यांनी केल्या आहेत.
इन्फो-
जिल्ह्यातील व्यावसायिक महाविद्यालये/ संस्था
अभ्यासक्रम - महाविद्यालये/ संस्था
एमबीए - २२
एमसीए - ०२
एमई - ०९
ए.फार्म - १०
आर्किटेक्चर - ०३
बीई / टेक - १९
बीएचएमसीटी - ०१
बी फार्मसी - २५
फार्म डी - ०२
डिप्लोमा इंजिनियरींग - २५
डी फार्मसी - ३१
डीएसएमसीटी - ०१