पंचवटीत ‘शाहीमुद्रा सोशल ग्रुप’च्या नावाखाली जुगाराचा धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:24 PM2018-10-09T17:24:31+5:302018-10-09T17:31:04+5:30
नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी (दि़८)मध्यरात्री छापा टाकला़ पोलिसांनी जुगार अड्डयाचा संचालक व तथाकथित पत्रकार राहुल बागमार उर्फ जैन याच्यासह २१ जुगाºयांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने व मद्यसाठा यासह २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी (दि़८)मध्यरात्री छापा टाकला़ पोलिसांनी जुगार अड्डयाचा संचालक व तथाकथित पत्रकार राहुल बागमार उर्फ जैन याच्यासह २१ जुगाºयांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने व मद्यसाठा यासह २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
पंचवटी पोलिसांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवरमधील बी-१ मधील दुसºया मजल्यावरील हॉलमध्ये छापा टाकला असता संशयित अमोल चिचे (, रा. क्रांतीनगर), लक्ष्मण बेंडकुळे ( रा. पेठ रोड), नीलेश शहा (रा. वाघाडी), सचिन बिरादर (रा. पंचवटी), रमेश केदारे (रा. रेल्वे कॉलनी), सोमनाथ खंडारे (रा. वाघाडी), मनोज पंडित (रा. क्रांतीनगर), वासू मोहन नाईक (रा. खडकाळी), मनोज खिंवसरा (रा. रविवार पेठ), विनय गोगालिया ( रा. महालक्ष्मी चाळ), आरिफ शेख (रा. नाशिकरोड), प्रीतम पवार (रा.गजानन चौक), नीलेश ठाकरे (रा. वाघाडी), कृष्णा वानखेडे (रा. वाघाडी), कैलास वाघ (रा़वाल्मिकनगर), हसीन खाटीक (रा़ संजयनगर), शौकत खान (रा. खडकाळी), भरत अहिरे (राक़्रांतीनगर), रफिक पठाण (रा. द्वारका), अदिल शेख (रा़भद्रकाली) हे जुगार खेळत होते़ या जुगाºयांना ताब्यात घेतले असता संचालक बागमार हा घटनास्थळी आला व पोलिसांशी वाद घातला़ यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेऊन रोख रक्कमव मोबाईल जप्त केला़
सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, के. डी. वाघ, रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे, पोलीस हवालदार पाटील, बस्ते, ठाकरे, पोलीस नाईक नरवडे, पवार, पोलीस कॉन्स्टेबल साळुंके, चारोस्कर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रहाणे, कोकणी व गांगुर्डे यांनी ही कारवाई केली़
बागमारची परिसरातून धिंड
पंचवटी पोलिसांनी जुगार अड्डाचालक तसेव कथित पत्रकार संशयित राहुल बागमार यांची मंगळवारी सकाळी पंचवटी परिसरातून धिंड काढली़ इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये ओली पार्टी करताना ग्रामीण पोलिसांनी बागमारला अटक केली होती़ त्यावेळीही त्याने पोलिसांना दमबाजी केली होती़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़
प्रत्येक डावामागे ७० रुपये कमिशन (नाल)
सिद्धीटॉवरच्या दुसºया मजल्यावर संचालक बागमार हा शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली जुगार अड्डा चालवित होता़ या ठिकाणी ३ पत्ते, १३ पत्ते व २१ पत्ते असा हारजितच्या पत्त्यावर जुगार चालत असे़ या जुगारीत डाव जिंकल्यास प्रत्येक जिंकलेल्या डावामागे ७० रुपये कमिशन (नाल) स्वरुपात बागमारला द्यावे लागत असे़
जुगारीसाठी प्लास्टीक क्वाईनचा वापर
जुगारींची तोबा गर्दी असलेल्या या अड्डयावर रोख रकमेचा वापर न करता ठराविक मूल्यांचे प्लास्टीकचे लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या केशरी रंगाचे क्वाईन्स दिले जात असते़ या क्वाईनवर ५०, १००, २००, ५०० पॉइंटच्या स्वरुपात रोखीचे मूल्य बागमार यास देऊन खेळात जिकलेल्या पॉर्इंटच्या मोबदल्यात रोख मूल्य जुगार खेळणाºयांरा देऊन जुगार खेळला जात असे़
२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त
सिद्धीटॉवरमध्ये जुगार अड्डयावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ यामध्ये १ लाख ३५ हजार रुपयांच्या चार दुचाकी (पल्सर - एमएच १५, बीजी २९५१, अॅक्टिवा - एमएच १५, ईएन ३५९२, टिव्हीएस - एमएच १५, डीव्ही ३८५४, इटर्नो - एमएच १५, बीई - ६९७६), १५ हजार ७०० रुपयांचे जुगाराचे साहित्य, जुगाराचे चित्रिकरण करणारे सीसीटीव्ही कॅमेराचे चिरायु पतसंस्थेमध्ये ठेवलेले ३० हजार रुपयांचे तीन डिव्हीआर, ३९ हजार ७०० रुपयांची रोकड, ६६ हजार ६०० रुपयांचे मोबाईल, विदेशी मद्य तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे़