उद्योजक सुधाकर पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:18 AM2018-01-30T01:18:32+5:302018-01-30T01:18:56+5:30
मूळचे नाशिककर परंतु, गेल्या ५५ वर्षांपासून इंग्लंडमधील हॅडफिल्ड शहरात वास्तव्यास असलेले उद्योजक सुधाकर मुरलीधर पाटील यांचे सोमवारी (दि.२९) पहाटे नाशिक येथील काठेगल्लीतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
नाशिक : मूळचे नाशिककर परंतु, गेल्या ५५ वर्षांपासून इंग्लंडमधील हॅडफिल्ड शहरात वास्तव्यास असलेले उद्योजक सुधाकर मुरलीधर पाटील यांचे सोमवारी (दि.२९) पहाटे नाशिक येथील काठेगल्लीतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. मूळ नाशिककर असलेले सुधाकर पाटील हे १९६२ मध्ये व्यवसायानिमित्त इंग्लंडला गेले आणि हॅडफिल्ड शहरात त्यांनी डिपार्टमेंटल स्टोअर्स सुरू केले. पुढे व्यवसायाचा व्याप वाढत गेला आणि पाटको या नावाने ब्रॅण्ड लोकप्रिय झाला. पाटील कुटुंबीयांचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांशी विशेष स्नेह होता. कुसुमाग्रज इंग्लंडला गेले त्यावेळी पाटील कुटुंबीयांकडेच त्यांचे वास्तव्य होते. सुधाकर पाटील हे इंग्लंडमध्ये स्थायिक झाले असले तरी त्यांची मातृभूमीशी नाळ जुळलेली होती. सुधाकर पाटील हे वर्षातील सहा महिने भारतात वास्तव्यास असायचे. दोन महिन्यांपूर्वीच ते नाशिकला आले होते. परंतु, सोमवारी (दि.२९) हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची दोन्ही मुले परदेशात स्थायिक आहेत.