स्मार्ट सिटीचे काम बंद केल्याने व्यावसायिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:44 PM2020-07-11T22:44:48+5:302020-07-12T01:56:47+5:30
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले.
नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले.
शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आलेल्या या सुमारे एक ते दीड तासाच्या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. व्यापारी एकता जिंदाबाद, बंद पडलेले काम सुरू झालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर काही व्यापाºयांच्या विरोधामुळेच काम बंद करण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र मुळातच व्यापाºयांचा विरोध नसून त्यांच्या नावाखाली दिशाभूल करण्यात आल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.सराफ बाजारातील साचणाºया पावसाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत गटारींची कामे सुरू करण्यास सांगितले होते. मात्र काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच हे काम बंद पडले.