व्यस्त दिनक्रमामुळे मुले स्वच्छंदी जीवनापासून वंचित

By admin | Published: November 14, 2016 12:44 AM2016-11-14T00:44:26+5:302016-11-14T00:46:06+5:30

यांत्रिकपणात वाढ : शाळा, क्लास, गृहपाठात सर्वाधिक वेळ व्यतित

In a busy schedule, children are deprived of a clean life | व्यस्त दिनक्रमामुळे मुले स्वच्छंदी जीवनापासून वंचित

व्यस्त दिनक्रमामुळे मुले स्वच्छंदी जीवनापासून वंचित

Next

 भाग्यश्री मुळे नाशिक
शाळेसाठी बस, रिक्षा, व्हॅनमधून प्रवास, शाळा, पुन्हा प्रवास, घरी आल्यावर जेवण करून क्लास, गृहपाठ, झोप अशा दिवसभराच्या व्यस्त दिनक्रमामुळे मुलांना खेळण्यासाठी, स्वत:तील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी अजिबातही वेळ मिळेनासा झाला आहे.
मातीत खेळणे, किल्ला बनवणे, झाडावर चढणे, लपाछपी खेळणे यांसारख्या लहानपणीच्या आठवणी हल्लीच्या मुलांच्या शब्दकोशातून गायब झाल्या असून, जीवघेणी स्पर्धा मुलांच्या मुळावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. या व्यस्त वेळापत्रकामुळे मुलांच्या शरीरात चौरस आहार जाणे अशक्य झाले असून लहान वयात मधुमेह, रक्तदाब असे विकार वाढल्याचे एका पहाणीतून समोर आले आहे. मुलांचे असे व्यस्त वेळापत्रक बनवणाऱ्या पालक, शिक्षकांनी अंतर्मुख होऊन हाती काय लागत आहे याचा विचार करायला हवा, असा सूर आता व्यक्त केला जात आहे.

Web Title: In a busy schedule, children are deprived of a clean life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.