‘समृद्धी’साठी दोन शेतकºयांच्या जमिनीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:24 AM2017-08-19T01:24:06+5:302017-08-19T01:24:26+5:30
प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील दोन शेतकºयांनी शुक्रवारी जमिनींची खरेदी दिली. पहिल्या टप्प्यात गेल्या जुलै महिन्यात १२ शेतकºयांनी समृध्दी महामार्गासाठी जमिनींची खरेदी दिली होती.
सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील दोन शेतकºयांनी शुक्रवारी जमिनींची खरेदी दिली. पहिल्या टप्प्यात गेल्या जुलै महिन्यात १२ शेतकºयांनी समृध्दी महामार्गासाठी जमिनींची खरेदी दिली होती.
गेल्या महिन्यात बारा शेतकºयांनी जमिनींची खरेदी दिल्यानंतर समृध्दीबाधीत अनेक शेतकºयांनी जमिन खरेदीबाबत तहसील कार्यालयात संमतीपत्र दिल्याचा दावा महसूल प्रशासनाने केला होता. आजही सुमारे ४०० हून अधिक शेतकºयांनी जमिनी खरेदीसाठी संमतीपत्र दिल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे येथील दोन शेतकºयांच्या जमिनींची खरेदी करण्यात आली. एका शेतकºयाने १८ गुंठे तर दुसºया शेतकºयाने ८० गुंंठे क्षेत्र समृध्दी महामार्गासाठी दिले आहे. त्यामुळे या शेतकºयांच्या खात्यावर प्रत्येकी १४ लाख ३४ हजार व ३२ लाख ८० हजार रुपये आरटीजीएस द्वारे बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील सुमारे चारशे शेतकºयांनी संमतीपत्र दिले असून त्याचे मुल्यांकनाचे काम सुरु आहे. पुढच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता तहसीलदार गवळी यांनी व्यक्त केली.