मुग, उडीद डाळीची हमी भावाने करणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:49 PM2020-09-23T23:49:30+5:302020-09-24T01:41:00+5:30
नाशिक- जिल्'ातील शेतकऱ्यांची मुग व उदीड हमीभावाने खरेदीसाठी शासनाने जिल्'ात दोन खरेदी केंद्रांना मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केट फेडरेशनने केले आहे.
नाशिक- जिल्'ातील शेतकऱ्यांची मुग व उदीड हमीभावाने खरेदीसाठी शासनाने जिल्'ात दोन खरेदी केंद्रांना मान्यता दिली असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी आॅनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केट फेडरेशनने केले आहे.
दर वर्षी केंद्र सरकार कडून शेतकºयांनी पिकविलेला माल हमी भावात खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला अनुमती देते. पिकांचे झालेले उत्पादन व खर्चाचा विचार करता व्यापाºयांकडून कमी भावात मालाची खरेदी केली जाते त्यात शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी हमी भावाने शेतमाल खरेदीची प्रक्रिया शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात आहे, त्याचाच भाग म्हणून चालू वर्षी मूग व उडीद अनुक्रमे 7196 व 6000 प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी येवला तालुका खरेदी विक्री संघ व मालेगाव तालुका खरेदी विक्री संघ या दोन ठिकाणी केंद्र सुरु करण्यात येऊन या ठिकाणी शेतकºयांनी नोंदणी करावी, मात्र त्यासाठी चालु हंगामातील पीक पेरी केल्याचा सातबारा उतारा, बँक खात्याची पासबुकची प्रत, आधारकार्ड, मोबाईल नंबर या गोष्टीची आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.