यंदा दुप्पट कांदा खरेदी करणार- नानासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:23 PM2019-04-22T13:23:31+5:302019-04-22T13:23:45+5:30

लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद.

Buy this onion twice a year - Nanasaheb Patil | यंदा दुप्पट कांदा खरेदी करणार- नानासाहेब पाटील

यंदा दुप्पट कांदा खरेदी करणार- नानासाहेब पाटील

googlenewsNext

लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद.
नाफेडने सुरू केलेल्या केंद्रामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?
लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत नाफेडने खरेदीविक्री संघामार्फत दि.१५ एप्रिलला कांदा खरेदी सुरू केली. दि. १६ एप्रिलला येथील बाजारपेठेत कांद्याला १०५१ रूपये भाव मिळाला होता. कांद्याला दि. १८ एप्रिल रोजी ११०१ रूपये भाव झाला. एकाच दिवसात २४५९६ क्विंटलची आवक झाली. त्यामुळे १ लाख २३ हजार रूपये कांदा उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झालीे.

बाजारभावात काय
सुधारणा अपेक्षित आहे?
भावासाठी भरीव तरतूद केल्याने निदान कांद्याचे बाजारभाव तरी सुधारतील. कांदा उत्पादकांना ही बाब दिलासा देणारी आहे. मागील वर्षी कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मिळणाºया दरातून उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले होते. केद्र सरकारच्या किंमत स्थिराकरण कोषातून यावर्षीही कांदा खरेदीबाबत केंद्र सरकारच्या सकारात्मक निर्णयामुळे कांदा घसरणीला ब्रेक लागणार आहे.

यावर्षी किती कांदा खरेदी
करणार, काही उद्दिष्ठ?
गेल्या तीन वर्षांपासून शासन कांदा खरेदी करीत आहे. तर यावर्षी नाफेड मागील वर्षाच्या दुप्पट कांदा खरेदी करणार आहे. कांदा खरेदी प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. मागील वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर भावात तीस टक्के वाढ झाली होती.महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन तर गुजरातमधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. कांदा साठवण्यासाठी गुदामे घेण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळाशी करार
प्रक्रि या पूर्ण करण्यात आली आहे.

उत्पादनात घट होण्याचा अंदाज
गेल्या वर्षीप्रमाणेच २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा देशात कांद्याचे उत्पादन अधिक होण्याचा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्र, गुजरातसह झारखंड, जम्मू-काश्मीर, मिझोराम, त्रिपुरा, केरळमध्ये कांद्याचे उत्पादन व राज्याच्या उत्पादनातील हिश्श्यात अंदाजात घट दर्शविण्यात आली आहे. महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये ८८ लाख ५४ हजार टन कांद्याचे उत्पादन झाले होते. पहिल्या अंदाजानुसार यंदा ८४ लाख ७४ हजार टनाचे उत्पादन अपेक्षित असून, उत्पादनातील हिस्सा आठ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते. नाफेड यावर्षी सर्वात मोठी खरेदी करणार आहे.

Web Title: Buy this onion twice a year - Nanasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक