रोबोटिक मशीन खरेदी; विरोध डावलून मंजुरी
By admin | Published: November 5, 2016 02:16 AM2016-11-05T02:16:57+5:302016-11-05T02:24:46+5:30
महासभा : यापूर्वी विरोध करणाऱ्या सदस्यांनीही सभेत पाळले मौन
Next
नाशिक : महापालिकेच्या मागील महासभेत नदी-नाल्यांतील गाळ काढण्यासाठी स्वित्झर्लंडवरून खरेदी केलेल्या रोबोटिक एक्सकॅव्हेटर मशीनच्या देखभालीसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चास हरकत घेतानाच मशीनच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह चिकटविणाऱ्या सदस्यांनी शुक्रवारी (दि.४) झालेल्या महासभेत या विषयावर सोयीस्कररीत्या मौन पाळले आणि महापौरांनीही चर्चेची संधी न देता प्रस्तावाला मंजुरी दिली. मागील महासभेत सदस्यांनी माजी आयुक्तांवर निशाणा साधत मशीन खरेदीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.