थेट बांधावर टरबुजाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:27 AM2018-03-29T00:27:25+5:302018-03-29T00:27:25+5:30
देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या बंधावर येऊ लागला आहे. येथील शेतकरी डाळिंबाची मोठी शेती करीत होता.
देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या बंधावर येऊ लागला आहे. येथील शेतकरी डाळिंबाची मोठी शेती करीत होता. त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात असल्याने त्यातूनही चांगली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी, अवकाळी पाऊस, गारपीट व हवामान बदल यामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. चालू वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगले आले; परंतु कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकºयांनी कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाट्याचे पीक घेतले जात होते; मात्र टमाट्याची गतही कांद्यासारखीच होत असल्याने अनेकवेळा शेतकºयांना टमाटे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. यामुळे येथील शेतकरी वेगळ्या पीकाकडे वळाला आहे. त्यातूनच त्यांना टरबूजची लागवड फायदेशीर वाटू लागली आहे. दोन वर्षांपासून कमी पाण्यातही येणाºया टरबूज व खरबूज पिकाकडे तरुण शेतकरी वळाला आहे. उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी असते. ठिबक सिंचन, मिल्चिंग पेपरचा अवलंबू करून शेतकºयांनी खरबूज, टरबूजची लागवड केली आहे. सध्या टरबूजला सहा ते सात रु पये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. एका टरबुजाचे वजन किमान पाच ते दहा किलोपर्यंत भरते, तेव्हा एका टरबुजाचे साधारणत: पंचवीस रु पये ते चाळीस रु पये शेतकºयाला मिळतात. टरबूज तोेडणीसाठी व गाडीत भरण्यासाठी माणसांची आवश्यकता असते. यामुळे गावातील स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध होत आहे. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज किंवा काकडी खाणे शरीरासाठी उपयोगी असते. टरबुजाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने परप्रांतीय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बांधावर येऊन भाव ठरवत आहेत. यामुळे शेतकºयाचे श्रम व वेळ आणि पैशांची बचत होत आहे.