नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून चार केंद्रांवर तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:13 PM2017-12-26T15:13:47+5:302017-12-26T15:17:24+5:30
सन २०१७-१८ या वर्षात गेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले आहे, त्यामुळे तुर उत्पादक शेतकºयांना बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यासाठी शासनाने तुर पिकासाठी ५२५० रूपये हमीभाव व अधिक २०० रूपये बोनस असे ५४५० रूपये जाहीर केले आहेत.
नाशिक: राज्य सरकारने यंदाही आधारभुत किंमतीने शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी नाशिक जिल्ह्यात जानेवारीपासून चार केंद्रे सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग फे डरेशनला अनुमती देण्यात आली आहे. या खरेदीसाठी शेतक-यांनी आपल्या तुरीची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०१७-१८ या वर्षात गेल्या वर्षाप्रमाणेच तुरीचे अधिक उत्पादन झाले आहे, त्यामुळे तुर उत्पादक शेतकºयांना बाजारभावापेक्षा अधिक दर देण्यासाठी शासनाने तुर पिकासाठी ५२५० रूपये हमीभाव व अधिक २०० रूपये बोनस असे ५४५० रूपये जाहीर केले आहेत. तुर खरेदी सुरू करण्यापुर्वी तुर उत्पादक शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांना तुर विक्रीच्या हमीभावाचा फायदा व्हावा यासाठी शेतकºयांनी तुर विक्रीबाबत संबंधित तालुक्याच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या तुर खरेदी केंद्रावर तुर विक्री करणा-या शेतक-यांना तयंच्या तुरीचे चुकारे शेतक-यांच्या बॅँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने करण्यात ये णार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात १३८८६ .५० क्विंटल तुर जिल्हा फेडरेशनने खरेदी केली होती.
यंदा नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव, लासलगाव, सटाणा या चार तालुक्यात खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असून, नोंदणीसाठी शेतक-यांनी तुर पिक पेरा असलेला सात बाराचा उतारा, शेतक-याच्या आधारकार्डाची प्रत, चेकबुकची प्रत किंवा बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, बॅँकेचे आयएफसी कोड व खाते क्रमांक, शेतकºयाचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात यावा असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.