लासलगाव बाजार समितीत आता द्राक्षमणी खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:41 PM2020-02-05T15:41:38+5:302020-02-05T15:41:55+5:30
लासलगांव : निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षमण्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र ी न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्र ीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.
लासलगांव : निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणा-या द्राक्षमण्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र ी न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्र ीस आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले.
प्रारंभी श्री. मोगल यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर पतंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी २२ रूपये प्रती किलो या दराने विक्र ी झाला. लिलाव शुभारंभ प्रसंगी मोगल यांनी सांगितले की, उगांव व परिसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली होती. गेल्या १४-१५ वर्षात या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्र मामुळे शेतक-यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्र ी केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतक-यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे अत्यंत कमी भावात द्राक्षेमण्याची खरेदी करून वजनमापातही शेतक-यांची फसवणूक होत असे. शिवाय सुरूवातीस काही रक्कम देऊन नंतर पैसे बुडविण्याचे प्रकार होत असे. सदर प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, नैताळे, विंचुर, लासलगांव व खानगांव नजिक येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उगांव येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्र ीतुन अडीच ते तीन कोटी रूपयांची उलाढाल होते. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्र ी न करता सदर खरेदी-विक्र ी केंद्रावर द्राक्षेमणी विक्र ीस प्राधान्य देतात.
याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, वैकुंठ पाटील, सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, विजय ढोमसे, अंबादास पानगव्हाणे, छोटुकाका पानगव्हाणे, पृथ्वीराज ढोमसे, मनोज पानगव्हाणे, द्राक्षेमणी खरेदीदार कृष्णा मापारी, दिलीप साबळे, रावसाहेब घुमरे, प्रमोद राठी, हर्षद राठी, राजाराम मापारी, दत्ता मापारी, एकनाथ आहेर आदी उपस्थित होते.