महापालिकेच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:55 AM2018-03-17T00:55:27+5:302018-03-17T00:55:27+5:30

देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभागात पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव नसल्याने पक्षाची मदार भोसले कुटुंबीयावरच असणार आहे, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीतही अंतर्गत बंडाळीच्या शक्यतेने द्विधावस्था निर्माण झालेली आहे.

In the bye-election of the municipal corporation, the army-BJP's reputation will be won | महापालिकेच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला

Next

नाशिक : देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभागात पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव नसल्याने पक्षाची मदार भोसले कुटुंबीयावरच असणार आहे, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीतही अंतर्गत बंडाळीच्या शक्यतेने द्विधावस्था निर्माण झालेली आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी येत्या २० मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. आतापर्यंत केवळ एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १३ मध्ये मनसेच्या सुरेखा भोसले यांच्यासह कॉँग्रेसचे शाहू खैरे व वत्सला खैरे आणि राष्टÑवादीचे गजानन शेलार निवडून आले होते. त्यावेळी, याच प्रभागात मनसे, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी अशी अघोषित युती बघायला मिळाली होती. आता, पोटनिवडणुकीत सदर जागेसाठी मनसेकडून भोसले कुटुंबीयातील अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. सद्यस्थितीत मनसेचा राज्यभर ओसरलेला प्रभाव आणि नाशिकमध्येही झालेली वाताहत पाहता पोटनिवडणुकीत पक्ष म्हणून फारसा प्रभाव राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे, पक्षाची मदार ही सर्व भोसले कुटुंबीयावरच आहे. पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे प्रचार सभेला येतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यात, गर्दी जमविणारे स्थानिक असे नेतृत्व उरले नसल्याने पक्षाच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मनसेच्या हातातून सदर जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाला महापालिकेतील गेल्या वर्षाच्या सत्ताकाळातील नागरिकांचा कौल आजमावण्याची यानिमित्ताने संधी चालून आली आहे, तर शिवसेनेने भाजपाच्या वर्षभराच्या कारभाराचा हिशेब मांडत समीकरणे बदलण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून ताकदवार उमेदवाराला पसंती दिली जाणार आहे. त्यात, शिवसेनेकडून माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण, तर भाजपाकडून माजी नगरसेवक हरीश लोणारी यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. भोसले कुटुंबीयातील सदस्य असेल, तर उमेदवार न देण्याची घोषणा करणाऱ्या कॉँग्रेस-राष्टÑवादीत मात्र द्विधा मन:स्थिती आहे. दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ असा उमेदवार नाही. त्यात, बंडखोरीची शक्यता वाढली आहे. माजी नगरसेवक रंजना पवार तसेच कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या पत्नी यांनीही उमेदवारीची तयारी चालविली आहे. याशिवाय सत्ताधारी भाजपातही बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी होणार अर्ज दाखल
पोटनिवडणुकीसाठी २० मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. चार दिवसांत अवघा एकच उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. शनिवारी (दि.१७) अमावास्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. रविवारी गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आहे. परंतु, त्यादिवशी कार्यालयाला सुटी असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. त्यामुळे सोमवारी (दि. १९) मनसेसह सेना-भाजपाकडून उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून आवश्यक ती ना हरकत पत्रे प्राप्त करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

Web Title: In the bye-election of the municipal corporation, the army-BJP's reputation will be won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.